HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“तुमच्या कामगिरीबद्दल तुमच्या गुरुला काय वाटतं हे विचारावंच लागेल”, निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना दणका

मुंबई | राजकारणात सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षावर सत्ताधारी पक्ष कायमच टीका टिपण्णी करताना दिसत असतातच. त्यातच राणे बंधु कायमच महाविकास आघाडी सरकारवर, कधी मुख्यमंत्र्यांवर तर कधी सरकारमधील नेत्यांवर टीका करत असतातच. आताही भाजपचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल (१३ मार्च) पंढरपूरात धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणावर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

धनंजय मुंडे यांनी कालच्या भाषणात मी ही कच्चा गुरुचा चेला नाही असं म्हटलं होतं. याच वाक्याला धरत निलेश राणे म्हणाले आहेत की, ‘वाह! काय स्वःतच कौतुक..फार मोठी राष्ट्रीय जबाबदारी पेलली आपण. तुमच्या गुरुला नक्की तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल काय वाटतं एकदा विचारावंच लागेल’, असे सूचक ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

 

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या निवडणूक प्रचारासाठी धनंजय मुंडे आले होते. यावेळी एका जनसभेला संबोधित करताना मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही नाव न घेता शरंसधान साधलं. मी कच्चा गुरुचा चेला नाही. कोणाचीही पावसात सभा झाली की यांची धसकी भरते.

मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यानं कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. टीका करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्हाला लोकशाही शिकवता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं, असा घणाघात मुंडे यांनी केला.

Related posts

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर

News Desk

कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk

मुंबईकरांना घडणार पाच उपवास, डबेवाले जाणार सुट्टीवर

News Desk