HW News Marathi
महाराष्ट्र

“पवार साहेब तुमच्या राज्यात तरुणी गायब होत आहेत?”, मेहबूब शेख प्रकरणावर राणेंचा सवाल 

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीची फौज मैदानात उतरली आहे. दरम्यान, मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. या तरुणीशी संपर्क होत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता.

यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत भाष्य केले आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. अशी बातमी वाचण्यात आली. शेखने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पवार साहेब तुमच्या राज्यात तरुणी गायब होत आहेत?, असा सवाल यावेळी राणे यांनी उपस्थित केला आहे. यावर शरद पवार किंवा राष्ट्रवादीकडून काय उत्तर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प बळीराजासाठी समर्पित

News Desk

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात पहिली

swarit

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक दुसऱ्या फेरीतही आघाडीवर!

News Desk