मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकरल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत शरद पवारांनी फटकारले हे वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले, असं सांगतानाच हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून होता?”, असा प्रश्न निलेश राणे यांनी पवारांना विचारला आहे.
स्वतःच्या नात्वाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 12, 2020
तर, या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनी काल पार्थ पवारांची पाठराखण केली होती. त्यांनी पार्थ यांना लंबी रेस का घोडा त्यांनी म्हटले होते. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजोबा नातू यामधील वाद संवाद या बद्दल आम्ही कायर बोलणार, हा त्यांचा घरचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.