मुंबई | मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे. निरुपम यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन हटविण्याची मागणी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या गटासह दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या समर्थकांनी ज्येष्ठ नेत्यांनी राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जु खरगे यांची भेट घेऊन केली आहे.
I am a Rahul Gandhi loyalist. I have been appointed by Congress President Rahul Gandhi. He has ordered me to fight for issues of Mumbai people, he will only decide till when I will serve as Mumbai Congress President: Sanjay Nirupam, Congress on reports of him being replaced. pic.twitter.com/EbLeGBVooo
— ANI (@ANI) September 17, 2018
या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जाते. “मी राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहे. राहुल गांधी यांनी माझ्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड आहे. मुंबईकरांच्या विविध प्रश्नांना लढा देण्यासाठी त्यांनी मला नियुक्त केले आहे. राहुल गांधी यांच्या आदेश येईपर्यंत मी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहीन, असे संजय निरुपम यांनी म्हटेल.”
मिलिंद देवरा हे काँग्रसेमधील सर्व गटांना एकत्र बांधून ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत निरुपम यांच्या ऐवजी देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.