HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा राणेंकडून सत्कार

मुंबई। शिवसेना भवनावर फटकार मोर्चाचे आयोजन केल्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आज आमदार नितेश राणे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. राणे नावाला शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन हा भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

राम जन्मभूमी ट्रस्ट वर बिनबुडाचे आरोप करून हिंदू धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि राम मंदिर उभारणीच्या आड येणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपा युवा मोर्चा ने थेट शिवसेना भवन वर धडक देऊन आंदोलन केले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

मागे न हटता भिडणाऱ्या भाजपा युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेतली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थक प्रशांत पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

swarit

“दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करू”-देवेंद्र फडणवीस

News Desk

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार! शिक्षणमंत्र्यांची माहिती

News Desk