HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेकडून मोफत पेट्रोल अन् पेट्रोल पंप निघाला भाजपच्या कार्यकर्त्यांचा

सिंधुदुर्ग। शिवसेना भवनावर राडा झाल्यानंतर आता सिंधुदुर्गमध्ये देखील शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येतेय. तर या उलट दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद काहीसा निवडत नाही तोवर पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वादाची ठिणगी पेटली सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मिटला.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका कार्यक्रमाच आयोजन केले. मात्र या आयोजनात त्यांनी भाजप ला डिवचण्याचाही प्रयत्न केला. वर्धापन दिनानिमित्त वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आणि उपक्रमानुसार एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केलं गेलं. मात्र ते पेट्रोल पंप नारायण राणे यांच्या मालकीचं होतं.

पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तिथे भाजपचे कार्येकर्ते आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या आक्षेपाचं रुपांतर राड्यात झालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेतला. ते सुद्धा भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र पोलिसांनी लगेचच सावधानता बाळगत वाद मिटला.

वैभव नाईक यांच्या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार होतं. भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार होतं. आमदाराच्या उपक्रमाची चर्चा आता सोशल मीडियावर चांगलीच रंगली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प! – मुख्यमंत्री

Aprna

परळी आगाराच्या चालकाने केले विषप्राशन

News Desk

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna