HW News Marathi
महाराष्ट्र

“म्हणून पुढच्या वेळी..चड्डीत राहायचं !!”, नितेश राणेंचा शिवसैनिकांवर हल्ला

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनयात्रेला काल(२० ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. मात्र या प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. असं असतानाच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे.

काय आहे ट्विट?

भाजप आमदार नितेश रान यांनी शिवसेनेवर ट्विट करता त्यांना टोला लगावला आहे. “अडवण्याची भाषा करणारे.. गोमूत्रावर आले.. म्हणून पुढच्या वेळी.. चड्डीत राहायचं!”, असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिजेत

नारायण राणे यांची जनयात्रा चालू असताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे.

त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकंल, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही, असे राणेंनी म्हटले. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीपद दिलं, त्यामुळे मला आपली सोबत हवीय, असेही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार,धनंजय मुंडे,जयंत पाटलांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी का पाठवली नोटीस?

News Desk

#CoronaVirus : पुण्यातील रेस्टॉरंट-बार उद्यापासून तीन दिवस बंद

swarit

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवामान खात्याचे केले कौतुक

News Desk