HW News Marathi
महाराष्ट्र

‘महाराष्ट्रात हिंदू असणे हा गुन्हा झाला आहे का?’, नितेश राणेंचा सरकारला सवाल

मुंबई। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथिलकरण्यात आले आहेत. मात्र काही गोष्टींवर निर्बंध कायम आहेत. गणेशोत्सव जवळ येत आहे. त्यास्तही सरकारने कोणताही जीआर काढला नसल्याने भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर विरुद्ध पुन्हा निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत हि नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात हिंदू असणे हा गुन्हा झाला आहे का?

नितेश राणे यांनी ट्विट करत हि नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,” येणाऱ्या मोहरम साठी महाराष्ट्र सरकार तातडीने GR काढू शकते. इथे दहीहंडी आणि गणेशोत्सव साठी जोरजोरात बोंबलून पण अजुन जीआर निघत नाही. महाराष्ट्रात हिंदू असणे हा गुन्हा झाला आहे का?”, असं ट्विट करत सरकार विरुद्ध नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

मोहरम साध्या पद्धतीने साजरा

कोविडच्या पार्श्वभुमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले असल्याने त्यानुसार गृह विभागाने मोहरम साध्या पद्धतीने करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

मातम मिरवणूका काढता येणार नसल्याच्या सूचना

‘योम-ए-आशुरा’ निमित्ताने मातम मिरवणूका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम करु नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘धोकादायक गावांचं होणार पुनर्वसन,’ पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहीती..!

News Desk

‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’

News Desk

३६ वर्षांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मतं मागितली !

News Desk