HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी मदत तरी केली, उद्धवजी कपड्याची इस्त्री न मोडता कोकणातून परतले – नितेश राणे

मुंबई | तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडून न देता ते मुंबईत परतले. याउलट एकनाथ शिंदे यांनी कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यासाठी मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. चिवला बीचवर ते राणे साहेबांचं घर पाहायला आले होते का? कदाचित त्यांचं आमच्यावरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. कारण याठिकाणी ते खूप दिवस राहिले आहेत, आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की, राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना, असा टोला नितेश यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे मुळात याला दौरा म्हणू शकता का ? देवेंद्रजी कोकणात फिरता हेत, मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तर द्यावी लागतील म्हणून उद्धव ठाकरेंनी हा दौरा केला का, असा प्रश्नही नितेश यांनी उपस्थित केला.

मग केंद्र सरकारला सांगा राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा

तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी कधीही विसर्जित होईल, दिलीप वळसे पाटील सावध राहा गोपीचंद पडळकर!

News Desk

#COVID19 : राज्यातील प्राणी संग्रहालये व वन्यप्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घ्यावी !

News Desk

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी; भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारीला मुंबई सायबर सेलने घेतले ताब्यात

Aprna