मुंबई | राज्यात सध्या मंदिरे पुन्हा सुरु करण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरु आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रातून मंदिर उघडण्याचा विषय मांडताना उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची करुन दिली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अशा शब्दांत उत्तर दिलं. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा अशी टीका केली आहे.
नितेश राणे यांनी २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. “धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा” अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली आहे. “यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”, अशी जहरी टीका राणेंनी केली आहे.
Don’t u want to reply to this too .. Mr CM ?
Or it’s just pure politics as usual ?
Sort out ur own house first before blaming others!!! pic.twitter.com/h6EZ6RFnLG— nitesh rane (@NiteshNRane) October 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.