HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळात २ नव्या नेत्यांना मिळणार स्थान तर अनेक खात्यांमध्ये होणार खांदापालट

मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खातेबदल होणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे गृहनिर्माण खाते दिले जाणार असेही म्हटले जात आहे. तर त्याबदल्यात कृषीसह एक वाढीव मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकतं. गृहनिर्माण, कृषी, रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार , अल्पसंख्यांक या खात्यांमध्ये बदली होणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असंही समजते. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मंत्रिमंडळात सामील होणार हे नवे चेहरे कोण, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान,नव्या बदलांनुसार सध्या राष्ट्रवादीकडे असणारं गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. जर खरोखरंच असा बदल झाला तर सध्या हे खातं ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आगामी काळात नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. तसंच शिवसेना या खात्यासाठी कोणत्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवजी बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला – नारायण राणे

News Desk

एल्गार परिषद : शरजील उस्मानीचा पुण्यात पोलिसांनी नोंदवला जबाब

News Desk

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली मान्यता

Aprna