HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिस मेगा भरती करुन जखमेवर मीठ चोळत आहात का? नितेश राणेंचा सरकारला सवाल

मुंबई | एकीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत केला. परंतु या निर्णयाला मराठा समाजाच्या नेत्यांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अशावेळी राज्यात पोलीस भरतीचा निर्णयाविरुद्ध मराठा समाजातून संतप्त भावना येत आहे.

 

यावर महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करणारे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, “राज्यात इतिहासातली सर्वात मोठी पोलीस मेगा भरती मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर का? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला? आगीत तेल टाकत आहात, जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का?ठ असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको,देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

शहीद पोलीस अधिकाऱ्यांना संपत्ती दाखवण्याची नोटीस

swarit

महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले,गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक खुलासा !

News Desk