HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल नाही तर आता ‘या’ तेलावर चालणार गाड्या, नितिन गडकरींचे संकेत

दिल्ली। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून देशातली सर्वसामान्य जनता आता त्रासलेली असताना केंद्र सरकार येत्या (८ते १०) दिवसात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार ऑटोमोबाईल क्षेत्रात फ्लेक्स-फ्ल्यूल इंजिन अनिवार्य करण्याच्या विचारात आहे. तर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. या निर्णयानं देशातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना फायदा होणारे, देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल असा दावा केंद्रीय आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोटरी जिल्हा परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पर्यायी इंधन इथेनॉलची किंमत प्रति लीटर ६०-६२ रुपये इतकी आहे तर देशाच्या अनेक भागांत पेट्रोलची किंमत प्रति लीटर १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल वापरुन भारतीयांना प्रति लीटर ३० ते ३५ रुपयांची बचत करता येईल.ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन तयार करतायेत ज्यामुळे ग्राहकांना १००% पेट्रोल किंवा १००% बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी संमेलन मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती त्यावेळी गडकरी म्हणाले होते. इथेनॉलचा वापर वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावून इंधन म्हणून करता येईल इथेनॉल कडे पर्यायी इंधन म्हणून देखील पाहता येऊ शकत म्हणून नागरिकांचे ३० ते ३५ रुपये वाचू शकता.

*उत्तम पर्याय ठरेल*

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, मी परिवहन मंत्री आहे. मी उद्योगाांना एक आदेश देणार आहे वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिनच नसेल, तर फ्लेक्स-फ्यूल इंजिनदेखील असतील, जिथे लोकांना १०० टक्के कच्चे तेल वापरण्याचा पर्याय असेल. केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले, मी ८ ते १० दिवसांत याबाबत निर्णय घेईन आणि ऑटोमोबाईल उद्योगासाठी आम्ही ते (फ्लेक्स-फ्यूल इंजिन) अनिवार्य करू अस यावेळी गडकरी म्हणालेत.

इथॅनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार होतं. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. कारण आपला देश कॉर्न सरप्लस आहे, आपण शुगर-गहु सरप्लस आहोत, आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गॅस सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू, 2 जण जखमी

News Desk

राजकारणाची खाज शमली असेल तर देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही

News Desk

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा, भाजप उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी

News Desk