HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे नितीन पाटील शिवसेनेत,औरंगाबादमध्ये कसा फायदा होणार ?

मुंबई | सध्या पक्षप्रेशांचं वारं अनेक पक्षांमध्ये जोरदार वाहताना दिसत आहे.माजी आमदार तथा भाजपचे नितीन पाटील यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार हे सुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. औरंगाबादमध्ये घडलेल्या या मोठ्या घडामोडीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलला खुप मोठा धक्का बसला आहे.

आगामी काळात औरंगाबाद जिल्हा बॅंकेची निवडणुक होणार आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये भाजपच्या नितीन पाटील प्रवेश केला आहे. तर या वेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, अॅड, देवयानी डोणगावकर यांची या वेळी उपस्थिती होती.

या पक्षप्रवेशाचा परिणाम परिणाम आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.नितीन पाटील यांच्या रुपाने शिवसेनेला सहकार क्षेत्रातील मोठा चेहरा मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही’ – छगन भुजबळ

News Desk

देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत, सचिन सावंतांनी भाजपवर साधला निशाणा!

News Desk

शरद पवारबद्दल दादा भुसेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; NCPच्या आमदारांचे वेलमध्ये आंदोलन

Aprna