मुंबई | राज्यात आजपासून (१४ एप्रिल) ८ वाजल्यापासून१५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आला आहे. काल (१३ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ही माहिती दिली होती.मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा, असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांवर सोडलंय. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल, असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ब्रेक द चेन नाही तर चेक द ब्रेन, असे खोचक ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
“Break the Chain”
Nah..
“Check the Brain”
sounds better for Maha CM n His Ministers!— nitesh rane (@NiteshNRane) April 13, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
दरम्यान, राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला असून, पुढील १५ दिवस संचारबंदी राहणार आहे. अनावश्यक येण-जाणं पूर्णपणे बंद करण्यात आलेय. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू देणार नाही. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे. रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, रिक्षा, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.