मुंबई । महाराष्ट्र राज्य एकीकडे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना दुसरीकडे देशात लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच येत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. “देशव्यापी लॉकडाऊनचा प्रश्न येत नाही. राज्यांनी देखील लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहावे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे”, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (२० एप्रिल) थोड्याच वेळापूर्वी देशातील कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधला आहे. ह्यावेळी देशव्यापी लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी सरकारची भूमिका मांडली आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
* देशात लॉकडाऊनची आवश्यकताच नाही
* देशव्यापी लॉकडाऊनचा प्रश्नच येत नाही. ह्या काळात जबाबदारीने वागावे.
* आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे.
* राज्यांनाही विनंती आहे की लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहावे
* आपल्या लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजून द्यावे.
* देशभरात सध्या ऑक्सिजन मागणी प्रचंड प्रमाणात आहे. ऑक्सिजन साठा वाढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
* गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लढाई आणखी मजबूत करण्याची आवश्यकता
* औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जात आहे.
* औषधनिर्मितीचे प्रमाण वाढवले आहे.
* भारतात जगातील सर्वात स्वस्त लस, आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे.
* जगातील सर्वाधिक वेगाने लसीकरणाची मोहीम देशात सुरू.
* आजपर्यंत देशभरात १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण
* आधीच्या स्थितीत आपल्याकडे कोरोनासंबंधी कोणतीही आरोग्यविषयक माहिती नव्हती.
* आज ह्या स्थितीत सुधारणा. अनेकांचे आयुष्य वाचवले जात आहे.
* आपण मजबुतीने कोरोनाविरुध्दची लढाई लढली आहे.
* अर्थचक्र आणि उद्योगविश्व सुरू राहील असाच आमचा प्रयत्न
* आपल्याकडे उपचार, लस, कोविड सेंटर्स आहेत. कमी काळात मोठी आरोग्ययंत्रणा उभारली.
* मजुरांनी आहे तिथेच थांबावं स्थलांतर करू नये
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.