HW News Marathi
महाराष्ट्र

कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी नवाब मलिक याचं मोठं विधान!

मुंबई। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, अस खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला?

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनिष भानुशालीचे काही फोटोही त्यांनी व्हायरल केले आहेत. एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असं सांगतानाच भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

“काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.भाजप बॉलिवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता, 21-22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलं. त्यामुळे 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता, कुठल्या मंत्र्यांना भेटला, याचं उत्तर एनसीबीनं द्यावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नाही”!

News Desk

महागाईची झळ टपरीवरच्या चहाला; राज्यातील चहा 2 रुपयाने महागला

Aprna

मोठी बातमी! १०वी-१२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षा गायकवाडांची घोषणा 

News Desk