HW News Marathi
महाराष्ट्र

कोणताही नवा प्रस्ताव नाही, निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर सहमती झाली होती !

मुंबई | कोणताही नवा प्रस्ताव येणार नाही किंवा पाठवणार नाही, असे इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. कोणताही नवा प्रस्ताव नाही, जे ठरले तेच द्या. आणि त्याप्रमाणेच करा, अशी मगणी राऊतांनी आज (६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदावर सहमती झाली होती, अशी आठवण राऊतांनी भाजपला करून दिली आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट आणणे म्हणजे जनादेशाचा अनादर होईल. राष्ट्रपती राजवट लादणे महाराष्ट्रावर अन्याय, असे विधान देखील राऊतांनी केले.

राज्यातील ओल्या दुष्काळाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याचे राऊत यावेळी म्हणाले, राऊत पुढे असे देखील म्हणाले की, शेतकरी कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत. शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी दुष्काळाची पाहाणी करत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनाचा मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्यांचे भेल होईल, असे म्हणत शेतकरी आमच्या पाठिशी असल्याचे राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेतून भाजपला सांगण्याचा प्रयत्न केला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश, सामनातून भाजपवर टीका

News Desk

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना !

News Desk

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श! – उपमुख्यमंत्री

Aprna