HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका!

मुंबई। ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही, त्यासाठी रक्तही असावं लागतं, आता तुमचं रक्त तपासण्याची वेळ आणू नका, अशा शब्दात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आता सडकून टीका केली आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन, नितेश राणे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.कितीही एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करा,ही आर-पारची लढाई लढू, असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील आझाद मैदानातून दिला आहे.

सोनिया गांधींसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा

मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन संबोधन करताना भाजप आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या आजारापणावरून टीका केली. मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला असल्याची खरमरीत टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मानेवर कसलीही सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला असल्याचे राणे यांनी मिश्कील शब्दात टीका केली आहे.

त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरून राज्यात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात या आझाद मैदानातील आंदोलनाचं नेतृत्व होत आहे. आणि यात आंदोलनात आज भाजपचे आमदार नितेश राणे सहभागी होऊन घेऊन राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. मात्र या सगळ्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारलं तर, परिवहन मंत्र्यांकडून विचारण्यात आलय, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रतिउत्तर परब यांनी दिल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याने कंगनाविरोधात गुन्हा दाखल!

News Desk

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध! – अजित पवार

Aprna