HW News Marathi
महाराष्ट्र

पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये ! संभाजीराजेंवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई | छत्रपती संभाजीराजे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता संभाजीराजेंनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली इच्छा बोलून दाखवली होती. यावरच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे म्हणाले कि, “सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ केली तर चळवळीतील प्रश्नांना यश मिळतं त्यासाठी मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये”, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बाह्यवळण रस्त्याचा शुभारंभ झाला त्याप्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यावेळी म्हणले कि, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडवणुकीतील राजकीय आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे लढणार असल्याचे देखील धंनजय मुंडे यांनी सांगितले. तसेच विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याने वायफळ चर्चेला अर्थ नसल्याचे देखील यावेळी धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

काय म्हणाले संभाजीराजे ?

संवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट संभाजीराजेंना प्रश्न विचारला, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, अशी मागणी का तुम्ही करत नाहीत. त्यावेळी संभाजीराजे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत असताना, मी ही मागणी करू शकत नाही, आणि असा प्रश्न मला विचारण्यापेक्षा, तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच मागच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना विचारा. तेवढे जमले नाही तर संभाजी राजांना मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यामुळं छत्रपतीची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट झाली का ?असा प्रश्न निर्माण होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातील मोठी बातमी ! राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

News Desk

शरद पवारांच्या हत्येचा कट, पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

News Desk

‘त्या’ बालकांच्या पालकांसमोर हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही !

News Desk