मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यामूळे रेल्वे सेवाही बंद आहे. त्यामूळे लॉकडाऊन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे न चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे आणि तशी माहितीही त्यांनी दिली होती. मात्र, तरीही १५ एप्रिलनंतर रेल्वे सुरु होणार असे लोकांना वाटत असल्याकारणाने लोकांचा हा समजही त्यांनी दुर केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लॉकडाउन नंतर रेल्वे प्रवासाबाबत कोणताही प्रोटोकॉल जारी करण्यात आला नाही. यासंदर्भात काही निर्णय झाल्यास संबंधित विभागांना त्याबद्दल माहिती देण्यात येईल, असे त्यांनी ट्विट केले आहे.
Ministry of Railways has not issued any protocol regarding passenger travel during post lockdown period, as has been incorrectly reported in some media reports
As and when a decision is taken, all stakeholders would be intimated. Please do not be guided by any misleading report
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 9, 2020
तसेच, प्रवासी रेल्वे जरी बंद असली तरी फक्त मालगाड्या सुरु असल्याची माहितीही रेल्वे मंत्रालयाने या आधी दिली होती. जोपर्यंत सरकारकडून कोणताही आदेश येणार नाही तोपर्यंत प्रवासी रेल्वे बंदच असणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.