HW News Marathi
महाराष्ट्र

आता अजित पवारांनी ‘चंपा’ म्हणणं थांबवलं नाही, तर…! चंद्रकांत पाटलांचा टोकाचा इशारा 

मुंबई । पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. अजित पवार यांनी पुन्हा एका चंद्रकांत पाटील यांचा “चंपा” असा उल्लेख केला आहे. याबाबत, आता चंद्रकांत पाटील कडाडून आक्षेप नोंदवत अजित पवार यांना इशारा दिला आहे.

पंढरपुरात भर सभेत भाषणादरम्यान “चंपा” असा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांना इशारा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेल असं सांगितलं होतं. मात्र, आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत ते मला करावे लागतील. अगदी त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील”, असा थेट इशारा आता चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार ?

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती. याच प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा “चंपा” या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. “अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टिकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका”, असे अजित पवार यांनी या प्रचारसभेत म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता मनसेच्याही रडारवर

News Desk

भोसरी प्रकरणात खडसे,पत्नी आणि जावयाविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र!

News Desk

१०वी-१२वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, विद्यार्थ्यांना अफवांना बळी न जाण्याचे आवाहन

News Desk