HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

आता गणेशोत्सव, नवरात्रीही उत्साहात साजरे करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : दहीहंडी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (19 ऑगस्ट) ठाणे शहर व परिसरातील विविध भागांतील मंडळांना भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढविला. गोपाळकाला निमित्त ठाणे शहरातील विविध मंडळांनी काल दहीहंडी उभारली होती. वेगवेगळ्या भागातून ही हंडी फोडण्यासाठी तरुण ठाण्यात जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेम्भी नाका, खेवरा सर्कल हिरानंदानी मिडोज, किसन नगर शाखा, वर्तक नगर, कोपरीतील अष्टविनायक चौक, रघुनाथ नगर, बाळकुम आदी ठिकाणच्या दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या. तसेच मीरा भाईंदर, भिवंडी येथील मंडळांनाही मुख्यमंत्र्यांनी भेटी देऊन गोविंदा पथकाच्या तरुणांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा उत्सव साजरा करण्यास निर्बंध होते. मात्र यंदा हा उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय अतिशय उत्साहात साजरा करावा. तसेच आगामी सण गणेशोत्सव व नवरात्र हे उत्सव देखील उत्साहात साजरे करावेत. पारंपरिक दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदासाठी राज्य शासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जखमी गोविदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच गोविंदाचा विमा उतरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरानंदानी मेंडोज येथील स्वामी प्रतिष्ठाण, वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान, भिवंडी येथे भेट दिली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्र्यांनी बोटीने प्रवास केला

दरम्यान, शिंदे समर्थक आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री साडे अकरा सुमारास हेजरी लावत उपस्थित असलेल्याना  मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली, असे सांगितले. तसेच “शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, सगळ्यांचे हे सरकार आहे. मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात”, असेही सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पिंपळास ते मोठागाव असा बोटीने प्रवास करून आणि डोंबिवलीची खाडी पार करून दीपेश म्हात्रे यांच्या हंडीला आले, यावेळी माजी महापौर पुडलीक म्हात्रे आणि शहरप्रमुख राजेश मोरे पण उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल नियुक्त जागांसाठी आघाडी सरकारकडून ‘या’ १२ जणांच्या नावाचा समावेश

News Desk

प्रताप सरनाईकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,किरीट सौमय्यांसह भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन !

News Desk

मराठा आरक्षण | संभाजीराजे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

News Desk