HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! शिवसेनेच्या लेटरहेडवरून नवनीत राणांना अॅसिड हल्ल्याच्या धमकीचे पत्र

मुंबई | राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी स्वतः याबाबत केलेल्या खुलशामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना निनावी पत्राद्वारे चेहऱ्यावर अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी पत्रासंदर्भात दिल्लीतील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर खासदार नवनीत राणा यांनी ८ फेब्रुवारीला संसदेत केलेल्या भाषणाचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी आपल्या या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या लेटरहेडवरून हे धमकीचे पत्र देण्यात आहे. त्याचप्रमाणे, तसेच पत्राच्या शेवटी सच्चा शिवसैनिक असेही लिहिण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदार नवनीत राणा आलेल्या या पत्रात त्यांचे पती आमदार रवी राणा यांनासुद्धा धमकी देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारीला नवनीत राणा तक्रार दाखल केली असून दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत !

News Desk

भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार

News Desk

पूरग्रस्त मुलीच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद उचलणार!

News Desk