HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवार राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत हे तपासण्याची वेळ आलीये”, नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

मुंबई | युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांना देण्यात यावा, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहेत. आता नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की, शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत हे तपासण्याची गरज आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते, सामना पेपरचे संपादक आहेत हे आम्हाला माहित आहे. परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत त्यामुळे हे योग्य नाही. जे या युपीएचा हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असा टोला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात बोलणार आहे. जरआमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहे. आमच्यामुळे सरकार आहे आम्ही सरकार नाही हे पहिल्या दिवशी सांगितलं आहे. ज्या पवार साहेबांची येथे वकिली करत आहेत ती वकिली त्यांनी थांबवावी, असा सल्ला पटोले यांनी राऊतांना दिला आहे. नाना पटोले म्हणाले, कोरोना आपल्या देशात आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असा आरोप पटोले यांनी या वेळी केला आहे.

तसेच महाआघाडीची सत्ता आल्यानंतर भाजप चिडलेली मांजर बनली आहे आणि त्याचाच परिणाम आज आपण बघतोय . जनतेच्या सर्व प्रश्नांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न भाजप करत असून महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल असे प्रयत्न करत आहे. सचिन वाझे आणि मनसुख प्रकरण सर्वांना माहित आहे. ATS पोलीस कारवाई करत असताना जिलेटीन नागपुरवरून आणण्यात आले.

या सर्व प्रकरणाचे तपास केंद्रीय यंत्रणा करत आहे. परंतु तपासयंत्रणेने दर दिवशी प्रसारमाध्यमांच्यामार्फत माहिती दिली पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तर दुसरीकडे एका प्रकरणाला दाबण्यासाठी दुसरं प्रकरण समोर आणत राज्याला बदनाम करण्याचे काम करीत आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं राऊत म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम पणे केलं आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतं आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.

UPAची चिंता संजय राऊतांनी करु नये ! – नाना पटोले

नाना पटोले यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या UPAच्या नेतृत्वाबद्दलच्या भूमिकेबाबतही इशारा दिला आहे. शरद पवार यांनी UPAचे नेतृत्व करावे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले कि, “संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? शिवसेना ही UPAची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनियाजी गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. UPAची चिंता संजय राऊत यांनी करु नये”, असेही नाना पटोलेंनी बजावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपिनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला एक स्वप्न पूर्ण, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे मंजूर!

News Desk

बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी छळ केला, नारायण राणेंचा गंभीर आरोप

News Desk

‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका

News Desk