HW News Marathi
महाराष्ट्र

आता अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या!

काबुल। अफगाणिस्तानात सगळं पालथं होत असताना आता, पाकिस्तानने या देशाला बुडवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. पाकिस्तानने तालिबानला आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत. तालिबानने सत्तेचा दावा केल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवादी आता तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात करत आहेत. पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात घुसून, काही भागात सामान्य जनतेची लुटालूट करत आहे.इतकंच नाही तर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाने काबूलसह अनेक ठिकाणी आपआपले चेक पोस्ट उभे केले आहेत.

पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात सक्रिय

जिहादच्या नावे जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं जात आहे.मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तालिबानने राष्ट्रपती भवनचा ताबा घेतल्यानंतर काही तासातच पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात सक्रिय झाल्या.

राष्ट्रपती हमीद करझई यांच्यावर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा समावेश

अफगाण सरकारमध्ये सिराजुद्दीन हक्कानीचा समावेश व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा उपनेता आणि वॉन्टेड घोषित दहशतवादी आहे. त्याच्यावर काबूलमधील एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. यामध्ये एका अमेरिकी नागरिकासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर 2008 मध्ये माजी राष्ट्रपती हमीद करझई यांच्यावर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा समावेश होता.

पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी…आता तुम्ही म्हणाल, इतका चांगला अर्थ मग कामं इतकी जिहादी का? तर कट्टर धार्मिक मदरशातून तालिबान उभा राहिलाय, त्यामुळे हे कसे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. सौदी अरेबियाने अफगाणिस्तानात असे मदरसे पोसले, ज्यात सुन्नी कट्टर इस्लामिक विचारधारेचा प्रचार केला जायचा. आधीच्या मुजाहिदीन जिहाद्यांमधीलच हा एक गट. पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील पश्तून भागात हा गट चांगलाच पोसला. ज्याला पाकिस्तानकडूनही चांगलीच मदत मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्री करा- छत्रपती संभाजीराजे

News Desk

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील

swarit

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा, घेतले महत्वाचे ‘हे’ निर्णय

News Desk