HW News Marathi
महाराष्ट्र

आता मराठ्यांच्या गनिमी कावा आंदोलन

औरंगाबाद-मराठा समन्वय समितीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गनिमी कावा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादेत समितीची महासभा पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. समितीने सरकारला आश्वासनपूतीर्साठी दोन महिन्यांचे अल्टीमेटम दिले. यापुढे गनिमी कावा आंदोलन करणार असून पुढील उद्रेकास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.

या महासभेसाठी राज्यभरातील २०० प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यात मूक मोचार्ही काढण्यात आला. मुंबईत ९ आॅगस्टला मराठा समाजाने अखेरचा मूक मोर्चा काढत, आरक्षणाची मागणी केली होती. राज्यभरात मराठा समाजाने अनेक मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली.

मुंबईतील मोचार्वेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मयार्दा देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोचार्वेळी म्हटले होते. तसेच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा महापारेषणमुळे तासाभरात पूर्ववत

Aprna

राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते – जे.पी.नड्डा

News Desk

#MaharashtraResult2019 : बारामतीत पवारांचा करिश्मा कायम, पडळकरांचे डिपॉझित जप्त

News Desk