मुंबई | चीनमधील वुहान येथे कोरोना वायरसमुळे अगणित लोकांनी प्राण गमावले. या वायरसच्या थैमानामुळे वुहान येथे अडकलेल्या अनेक अनिवासी लोकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. पण तरीही काही भारतीय लोक तिथे अडकल्याची माहिती मराठमोळ्या अश्विनी पाटील हिने एक व्हिडिओ शेअर करत दिली. तिने मागितलेल्या या मदतीला हाक देत पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्काळ तिच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला होता. चीनमधून भारतीयांना मायदेशी परत आणणे जरा कठीण असले तरी परराष्ट्र मंत्री आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करत भारतीयांना लवकरच मायदेशी परत घेऊन येणार आहेत.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साताऱ्याच्या अश्विनीसोबत संपर्क साधत वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका फोनमुळे अश्विनी आणि तिथे अडकलेल्या आणखी भारतीयांना धीर मिळाला आहे. तसेच त्यांच्या पर्यायी पासपोर्टची व्यवस्था देखील लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. काल (२५ फेब्रवारी) ट्विटरवर ट्विट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी अजूनही वुहानमध्ये ९० जण अडकल्याची माहिती दिली आहे. त्यातील ८ जण हे महाराष्ट्रीयन आहेत. आम्ही सगळ्या भारतीयांना लवकरच मायदेशी परत आणू असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
There are still about 90 Indians stuck at Wuhan, China. 8 of them are from Maharashtra. I’ve spoken to all of them and their families here. I’ve been told that the Air Force flight will be landing tomorrow in China. We all pray for their safe and early return. #Coronavirius pic.twitter.com/Y5UcTAuqKb
— Prithviraj Chavan (@prithvrj) February 25, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.