HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘ही’ आहेत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यासह ३ मंत्र्यांची नवी निवासस्थाने

मुंबई | गेल्या महिनाभराच्या सत्ता संघर्षानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री पदीचा सूत्र सांभाळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्या तीन मंत्र्यांच्या बंगल्याचे वाटप जाहीर झाले आहे. यात मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’ बंगला, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा एकदा ‘रामटेक’ बंगल्यावर राहणार आहे.

तसेच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ बंगल्यावर तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ बंगल्यावर राहणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर शासनाच्या वतीने मलबार हिल येथील ‘सागर’ हा बंगला देण्यात आला आहे.

रामटेक बंगल्याबद्दल नेत्यांमध्ये भिती

रामटेक हा बंगला पुन्हा एकाद भुजबळ यांना देण्यात आला. मात्र, रामटेक बंगल्याबद्दल अनेक गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहेत. जो नेता रामटेक मध्ये राहण्यास जातो त्यांच्यावर कोणत्याना कोणत्या आरोपावरू त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. असे अनेक गैरसमज पसरले आहेत आणि याचे अनेक उदाहरण देखील पाहायला मिळतात.

यातील सर्व मोठे उदाहरण म्हणजे छगन भुजबळ यांना १९९९च्या सुमारास रामटेकमध्ये राहण्यास गेले. मात्र, भुजबळ यांच्यावर तेलगी प्रकरणी त्यांना त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भुजबळांच्या आधी रामटेक हा बंगला गोपीनाथ मुंडे यांना हा बंगाल मिळाला होता. मात्र, त्यावेळी मुंडेंवर विविध आरोप झाले होते. यानंतर फडणवीस सरकारच्या काळात हा बंगला एकनाथ खडसे यांना मिळाला. मात्र, खडसेंवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अवघ्या दीड वर्षात मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सर्वप्र करणामुळे राज्यातील सर्व मंत्र्यांना रामटेक बंगल्याची भिती वाटू लागली.

 

 

Related posts

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk

जनतेची लूट, विकासकामात तूट, जाहिरातबाजी आणि उधळपट्टीला सूट! अशोक चव्हाण

News Desk

आपले राजकीय मतभेद असतील पण आम्ही सूडाने वागणारे नाही !

News Desk