HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे लॉकडाऊन करणार

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरोनामूळे कारागृहातील कैद्यांनाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येणार आहेत.

संबंधित कारागृहाच्या अधिक्षक कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक २ शिफ्टमध्ये करणार आहेत. कारागृहातच राहणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात येणार आहे. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी. कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन नंबर देण्यात येतील.या अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी काहीही अडचण आली तर वरिष्ठांकडे संपर्क साधायचा आहे. तसेच,संबंधित कारागृहांना या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, अशी निल देशमुख यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने राष्ट्रवादीचा ३ जानेवारीला राज्यभर महिला शिक्षण दिन प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती

News Desk

प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या वकिलपत्राचा राजीनामा; गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

Aprna

लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक, दोन गटात हाणामारी

News Desk