HW News Marathi
महाराष्ट्र

नवरात्रीच्या मुहुर्तावर खडसे राष्ट्रवादीत जाणार ?

मुंबई | अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्याच पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. तसेच, ते पक्षांतर करणार अशाही चर्चा सुरु होत्या. नेमकी ते कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित नव्हते मात्र पहिले नाव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे येत होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार यावर त्यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबरला कमळाचे फुल सोडत हातात घड्याळ बांधणार असल्याचे समजले जात आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार (mla) आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपमधील अनेक नेत्यांनी एखनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाही असा दावा केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंनी आमच्या २ थोबाडीत मारावे असेही म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही नाथाभाऊंना राजकारणाची जाण आहे असे म्हटले होते. मात्र, भाजपच्या या सर्व नेत्यांचे दावे खोटे करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीची वाट धरणार आहेत. त्यांना कोणते पद मिळणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महत्वाची बाब म्हणजे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही त्यांना रिपाईत येण्याची ऑफर दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो – उदयनराजे भोसले

News Desk

अविनाश जाधवांना मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच केली अटक, तरीही २७ एप्रिलला आरतीचा निर्धार

News Desk

सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे धनगर समाजाचा उद्रेक

News Desk