HW News Marathi
Covid-19

…नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय !

बीड । एकीकडे राज्यशासन कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून त्यांच्या परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालयात ‘कोरोना हेल्प सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. याद्वारे “हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, आपली विचारपूस करण्यासाठी फोन केला आहे….” यास्वरूपाचे कॉल बीड जिल्ह्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना येत आहेत.

कोरोना बाधित रुग्णांची या हेल्पसेंटरद्वारे धनंजय मुंडे यांच्यावतीने दूरध्वनीवरून आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, काही मदत हवी का? एखाद्या रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास तिथे बेड उपलब्ध करून देणे, विविध औषधोपचार उपलब्ध करून देणे यासह रुग्णांकडून येणाऱ्या तक्रारी आदी दूर करण्यासाठी या हेल्पसेंटर द्वारे मदत करण्यात येत आहे.

२६ कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र मदत कार्य !

धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या कार्यालयाच्या वतीने ‘कोरोना हेल्प सेंटर’ असा एक ग्रुप तयार करण्यात आला असून याद्वारे २६ कर्मचारी अहोरात्र मदत कार्य करत आहेत; स्वतः धनंजय मुंडे देखील या ग्रुपचे सदस्य असून वेळोवेळी रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना देत असतात.

कुठल्याही रुग्णाने उपचारासंबंधी कोणतीही मागणी किंवा तक्रार केल्यास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विविध कोविड रुग्णालये, तेथील डॉक्टर्स, खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स, मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर आदी मोठ्या शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालये, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आदी महत्वाच्या व्यक्तीना संबंधित रुग्णांची तक्रार निवारण करण्यासंबंधी तातडीने कळविण्यात येते व संबंधित अडचण सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो.

या हेल्प सेंटरच्या माध्यमातून कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णांची देखील विचारपूस करण्यात येत असून, खाजगी रुग्णालयांमध्ये बिलांमध्ये सवलत मिळवून देणे, बिलाची रक्कम कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा अन्य तत्सम योजनांमधून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोमय्या म्हणतात -“करुन दाखवलं”, पुढचा नंबर कुणाचा?

News Desk

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप

News Desk

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यात २७ जानेवारीपासून सुरू होणार प्रत्यक्ष शाळा

News Desk