HW News Marathi
देश / विदेश

पुन्हा एकदा पीयूष गोयल यांच्या हाती रेल्वे मंत्री पदाचा कार्यभार

मुंबई | पीयूष गोयल यांच्याकडे पुन्हा एकदा रेल्वे मंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले पीयूष गोयल यांनी मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ ते २०१७ या कार्यकाळात वीज,कोळसा आणि ऊर्जा ही खाती त्यांनी भूषविली.

यानंतर गोलय यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थ मंत्री या महत्वाच्या पदाचा पदाभार देखील त्यांनी सांभाळला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध सवलतींचा पाऊस पाडणारा अर्थसंकल्पही त्यांनीच सादर केला होता. तर आता यावेळी नव्या रचनेत अर्थमंत्री अन्य महत्वाचे खाते त्यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अन्यथा परिणामांना तयार राहा”, केंद्र सरकारचा Twitter ला इशारा!

News Desk

‘चांद्रयान – २’च्या यशस्वी मोहिमेनंतर काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न

News Desk