HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारला नख लावणे इतके सोप्पे नाही, हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे – संजय राऊत

मुंबई | देशात सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. अशातच काँग्रेस पक्षाने राजस्थानमधील सरकार वाचवले पाहिजे. अन्यथा त्यामुळे देशभरात वेगळा संदेश जाऊ शकतो, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याविषयी भाष्य करताना ते म्हणाले की, राजस्थानमध्ये सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन कमळ हा सत्तेचा गैरवापर असल्याचे मत संजय राऊत यांनी आज (१३ जुलै) प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले.

देशाच्या समस्येवर कुणी बोलत नाही. अशावेळी राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी काडी टाकायची, हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व लालसे मधून हे राजकारण होत आहे. मध्य प्रदेश गेल्यानंतर काँग्रेसने आता राजस्थान वाचवायला हवं. अन्यथा वेगळा संदेश जाईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारचा कोणताही धोका नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारला नख लावणे इतके सोप्पे नाही. हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेच्या टीकेला बहीण प्रीतम मुंडेंच सडेतोड प्रतिउत्तर!

Aprna

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

Aprna

“मराठा आरक्षणाच्या या दुर्देवी निर्णयाचा परिणाम लाखो मराठा तरुणांवर होईल”, विनोद पाटील भावूक

News Desk