मुंबई | शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा आज (१३ जुलै) शेवटचा दिवस होता. यात लोटस किंवा ऑपरेशन कमळ हा शब्द आपण अनेकदा भाजपा नेत्यांच्या तोंडून ऐकला आहे. हे ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन लोटस म्हणजे काय? हे आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी सांगितले आहे. ऑपरेशन कमळ म्हणजे काय? असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी उत्तर देताना असे म्हटले की, “ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निवडून दिलेली सरकारं दुबळी करणं. त्यासाठी केंद्रातल्या सत्तेचा पुरेपूर वापर करणं”
महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असे सातत्याने पसरवले जात आहे. असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले “हो पहिल्यांदा त्यांनी तीन महिन्यात सांगत होते. आता सरकारला सहा महिने झाले. त्यानंतर सप्टेंबरचा वायदा आहे, काही लोक ऑक्टोबर महिन्याचा वायदाही करत आहेत. मात्र मला खात्री आहे की पाच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या राज्याचा कारभार करेल. ऑपरेशन कमळ असो किंवा आणखी काही असो याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरेंच्या सरकारवर होणार नाही.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.