HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार काम करते हे विरोधकांना पचत नाही !

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या (२४ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. महाविकासआघाडी सरकारचे हे पहिले अर्थसंकलीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची यादी उद्या जाहीर करून, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (२३ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येत्या तीन महिन्यात राज्याती कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे आश्वास दरम्यान, २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे. उद्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावरून सरकार काम करतेय हे विरोधकांना पचत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी घेतली. स्वतः काही करायचे नाही, आणि आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींवर टीका करायची, अशी भूमिका विरोधी पक्षाची आहे. त्यामुळे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे

  • भाजपशासित राज्य जास्त अशांतता आहे
  • एनपीआरमध्ये अडचणीचे मुद्दे आले तर विचार करू
  • मी एल्गार परिषदेचा तापस केंद्रकडे दिला नाही, त्यांनी त्यांच्या अधिकार घेतला
  • सीएए, एनपीआरबद्दल भूमिका स्पष्ट केली, एनपीआरमध्ये अडचणी आहे का हे तपासू असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • ३५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती सरकारकडे आहे
  • विरोधकांचे वय ६ ते १८ वर्षामध्ये असे तरही त्यांना चष्मा देऊ, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांचा टोला
  • गिरणी कामगारांच्या घरासाठी १ मार्चला लॉटरी
  • येत्या तीन महिन्या शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करणार
  • विरोधकांच्या सर्वाच प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही
  • सरकार काम करते हे विरोधकांना पचनी पडत नाही,
  • शेतकऱ्यांच्या मनात विरोधाक गैरसमज पसरवित आहे
  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करू
  • उद्या ठाकरे सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे
  • मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेला उशीर झाल्यामुळे उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा!

News Desk

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येणार?

News Desk

बेस्टच्या २६ AC इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk