HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेत फडणवीसांचा व्हिडिओ बॉम्ब, राज्य सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत व्हिडिओ बॉम्ब टाकला. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचे सांगत फडणवीसांनी काल (८ मार्च) पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला. सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकिलांची मदत घेतली गेली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना संपण्याचा कसा कट रचला गेला आहे. यामुळे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवल.

आपल्यासमोर एक सुरस कथा मांडायची आहे, ही कथा एका अशा कत्तल खान्याची आहे, त्यात विरोधकांची कत्तल कशी करायची यासंदर्भातले षडयंत्र आहे, असे सागंत फडणवीस यांनी पुरावे वाचून दाखवले. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकासआघाडीने केलेले षडयंत्र इतके मोठे आहे ही कथा इतकी मोठी आहे की यावर २५ ते ३० वेबसीरीज तयार होतील. हे कथानक सत्यघटनेवर आधारीत आहे. यासंदर्भातला प्रत्येक व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

सरकारी वकील गुन्ह्याचा गट रचत आहेत

सरकारी वकिलांचे कार्यालय हे विरोधकांना संपवण्याचे प्रमुख जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून, ड्रग्सचा धंदा कसा दाखवायचा, केस कशी करायची, कशीही करुन केस कोणत्या कायद्यात फिट बसेल, त्याचे नियोजन कसे करायचे, अशाप्रकारे गुन्हेगारीचा कट सरकारी वकिल रचतोय, पुढे त्यात पोलिसही आले आहेत. काही मंत्र्यांचाही सहभाग आहे. 

षडयंत्राचा व्हिडिओ

ही सगळी जी कथा आहे ती सर्व सरकारी वकिल आपल्या तोंडाने सागत आहेत या पेन ड्राईव्हमध्ये ते आहे. प्रत्येक घटनेचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. महाविकास आघाडीच्याच कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांच्या संदर्भातले खुलासे देखील त्यात तुम्हाला पाहात येईल यासर्वांचं सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग आहे, असे फडणवीस म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार कधी क्रिरेट खेळले तरी ते क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत ना? सदाभाऊंचा निशाणा

News Desk

राज्यात वीज पडून नऊ जण ठार

News Desk

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

Arati More