HW News Marathi
महाराष्ट्र

“कोण होतास तू…काय झालास तू”, फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

मुंबई। “कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…”, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. राज्यातील अमरावती आणि मालेगाव मध्ये मोर्चे हे नियोजन करून निघाले होते. त्यामुळे त्या मोर्चांच्या तुमचे समर्थन होते, असा आरोप ही फडणवीसांनी सरकारवर केला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख करणारे ट्वीट केलं होतं. यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाल्याचा दावा त्यांनी आज (१६ नोव्हेंबर) भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत केला आहे. परंतु, कुणालाही माहिती नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघून शकतात? नियोजनाशिवाय हे असे मोर्चे निघणे शक्यच नाही? जर या मोर्चाचं नियोजन झाले असेल तर सरकार, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही? , असे अनेक सवाल फडणवीसांनी उपस्थित केले आहे. या बैठकीत फडणवीसांनी सरकारला नक्षलवाद आणि अमरावती हिंसाचार या विषयांवरून फडणवीसांनी घेरलं.

कितीही डोमकावळे मानेवर बसले तरी सगळ्यांना पुरून उरू!

“काही लोकं हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्हीवर दिसतात. तर काही कोंबडे दिवसभर चॅनेलवर दिसतात. गरुडावर कावळा बसतो. तो गरुडाला चोच मारतो. गरुड काहीही बोलत नाही. मग गरुड दोन्ही पंख पसरुन आकाशात झेप घेतो. इतक्या उंचावर जातो की, कावळ्याला श्वास घेता येत नाही तो खाली पडतो. भाजप गरुडासारखी आहे. कितीही डोमकावळे मानेवर बसले की एकदा आपण पंख पसरले तर या सगळ्यांना पुरून उरू, असे फडणवीस म्हणालं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षा राऊत आज ई़डी कार्यालयात चौकशीला जाणार नाही, तर ईडीकडे काही दिवसांचा मागितला वेळ – संजय राऊत

News Desk

‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान; ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!

News Desk

लोकाभिमुख पोलिसिंगचा उत्तम आदर्श म्हणजे डॉ. के. वेंकटेशम

News Desk