HW News Marathi
Covid-19

प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याऐवजी आता तोंडी परीक्षा ! विद्यापीठांकडे ‘हे’ ३ पर्याय

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायचा ? याबाबतचा निर्णय अनेक दिवस खोळंबून राहिला होता. मात्र, आता अखेर हा निर्णय झाला आहे . या निर्णयानुसार, आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याऐवजी व्हायवा म्हणजे तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी ३ पर्याय सुचविण्यात आले आहेत. पहिला ओपन बूक, दुसरा एमसीक्यू, तर तिसरा असाईनमेंट असे ३ पर्याय देण्यात आले आहेत. दरम्यान, आता राज्यातील प्रत्येक विद्यापीठाला या ३ पैकी एक पर्याय निवडायचा आहे.

“विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देण्यासाठी परीक्षा पद्धतीचे ३ पर्याय आहेत. यात ऑनलाईन, ऑफलाईन, MCQ या ३ पर्यायांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डाप्रमाणे निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करण्यात येतील.पण विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असे निश्चित समजायला हरकत नाही”, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कुलगुरुंच्या समिती अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचा आपला अहवाल आज (४ सप्टेंबर) राज्य सरकारकडे सुपूर्द करणार आहे. आता अकादमी कौन्सिलकडून या अहवालाला परवानगी मिळाल्यानंतर हा अहवाल मान्यतेसाठी परीक्षा मंडळाकडे पाठवावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देता यावी, यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. उदय सामंत यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या अध्यक्ष पदाची ऑफर स्वीकारणार का?

News Desk

ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

News Desk

‘राजीव गांधी फाऊंडेशन’ भाजपचा काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न, विचारले ‘हे’ १० प्रश्न

News Desk