मुंबई । पालघर, ठाण्यासह मुंबई आणि उपनगरांत शुक्रवारपासून (२ ऑगस्ट) बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणे प्रभावित झाली आहेत. त्याचप्रमाणे, हवामान खात्याकडून येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी (५ ऑगस्ट) पालघर, ठाणे, रायगडसह मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
All Government and Semi Government employees in MMR Region are allowed to report late on their duties.
Government also appeals people to stay safe at home if it is not necessary to go out.
All emergency services to function as usual.#MumbaiRainsLiveUpdate
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 4, 2019
Due to the IMD warning for tomorrow, holiday declared for schools & colleges in Mumbai & MMR, Palghar, Thane, Raigad districts.#MumbaiRainsLiveUpdates #MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 4, 2019
शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी उद्या (५ ऑगस्ट) आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशीही माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.