HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूर | गेल्या सहा दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात पाणी साचले आहे. तर पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर वाढल्याने ६५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि १६ जिल्हामार्गावर पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक वळवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६३ गावांचा संपर्क तुटला असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे

जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने नद्या ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. पावसामुळे यंदा पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १६००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील भाजी मंड्याही बंद झाल्यामुळे नारीकांची गैरसोय झाली.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर ओसंडून वाहत असल्याने हवेत देखील गारठा निर्माण झाला आहे. या पावसाने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होऊन ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे ती गगनबावडामार्गे वळविण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ नवाब मलिकांचा पुन्हा एकदा वानखेडेंवर निशाणा!

News Desk

फडणवीसांच्या वृक्ष लागवडीच्या ‘ड्रीम’ प्रोजेक्टची होणार चौकशी, समितीला ६ महिन्यांची मुदत – अजित पवार

News Desk

पंतप्रधान पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला

News Desk
देश / विदेश

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

News Desk

नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतीनियुक्ती करत असलेल्या १२ पैकी चार जागा रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी राज्यसभेतील सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.

उत्तर प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते राम शकल, शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा, लेखक राकेश सिन्हा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंह यांना राज्यसभेची खासदारकी जाहीर झाली आहे. हे चारही दिग्गज त्यांच्या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.

तसेच राज्यसभेतील क्रिकेटकर सचिन तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्त्या अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. या नियुक्तीमध्ये विशेष म्हणजे चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही.

सामाजिक कार्यकर्ता राम शकल

जेष्ठ नेते राम शकल यांनी उत्तर प्रदेशात सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी दलित समाजासाठी मोठे काम केले आहे. राम शकल हे ५५ वर्षीय असून गोरखपूर विद्यापीठातून एम. ए.ची पदवी मिळावली आहे.

शिल्पकार राकेश सिन्हा

शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा हे ओडिसाचे आहेत. मोहापात्रा यांनी जगन्नाथ मंदिरासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसेच मोहापात्रा यांनी भव्य मुर्त्या आणि शिल्प बनवून विक्रम प्रस्थापित केला आहे.

लेखक राकेश सिन्हा

स्तंभलेखक राकेश सिन्हा दिल्ली विद्यापीठातून एम. फिल. केले असून ते विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर कोटा विद्यापीठातून पीएचडी केली आहे. सिन्हा यांनी विविध पदांवर काम केले आहे.

नृत्यांगणा सोनल मानसिंह

सोनल मानसिंह या देशातील प्रख्यात नृत्यांगणा आहेत. मानसिंह या शास्त्रीय नृत्यात त्या पारंगत आहेत. तसेच २००३मध्ये मानसिंह यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Related posts

४८ तासांसाठी इंटरनेट सेवा राहणार बंद ?

News Desk

Union Budget 2021 | या ‘४’ राज्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा!

News Desk

रघुराम राजन आपचे खासदार

News Desk