HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा!


नांदेड। देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. या पक्षप्रवेशानंतर भाजपचा मेळावाही पार पडला. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागलं.

मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार

अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी चव्हाणांना लगावलाय. सरकारमधील लोक नोटा मोजून थकली. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचं, असं आवाहन खोत यांनी देगलूरमधील मतदारांना केलंय.विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले. अतिवृष्टीनंतर आता आम्हाला हे काय देणार? मला खात्री आहे हे काही देणार नाहीत, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

निवडणुकीत चाबकाचा फटका काढून सगळा हिशेब घ्यायचा आहे

महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्याकडे बांधकाम खातं आहे त्यांच्याच जिल्ह्यात खड्डे आहेत. डांबर खाल्लं, मुरुम खाल्ला, असा घणाघात खोत यांनी चव्हाणांवर केलाय. शेतकऱ्यांना मदत द्या मग मतदान मागा. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असं होऊ देऊ नका, असा सल्लाही खोतांनी मतदारांना दिलाय. एफआरपी दिला नाही. शेतकऱ्याकडे मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. बारा बलुतेदारांना मदत नाही. वीज कनेक्शन कट करायला या, या निवडणुकीत आम्ही तुम्हाला कट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच खोतांनी दिलाय.आम्ही बोलायला लागलो की कोरोनाचे नियम आठवतात. आम्ही घरात बसल्यावर काय माती खाणार का? आम्ही आम्ही घरात बसल्यावर तुम्ही माती खाणार आहात का? तुम्हाला जेसीबीद्वारे फुलं टाकलेली चालतात. आम्हाला मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगता. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांना निवडून द्या. या निवडणुकीत चाबकाचा फटका काढून सगळा हिशेब घ्यायचा आहे, असंही खोत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा उमेदवार हरला तरी पर्वा नाही ! पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं विधान

News Desk

आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो आहोत का? राऊतांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक 

News Desk

पंकजा मुंडेंचे अश्रू समजून घ्या विजय वडेट्टीवारांचं विधान!

News Desk