HW News Marathi
महाराष्ट्र

नालासोपारा स्फोटके प्रकरणात श्रीकांत पांगारकरची आर्थिक मदत | सीबीआय

जालना | नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरातून महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक (एटीएस)ला अधिक स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या घरी सापडलेले स्फोटकांमागे श्रीकांत पांगारकरची मोठी आर्थिक मदत केली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने पुढील चौकशीसाठी पांगारकरला २६ तारखेपर्यंत सीबीआयच्या कोठडीत पाठविले आहे.

या प्रकरणात वैभव राऊत व्यतिरीक्त सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना एटीएसने ताब्यात घेतले. या तिघांच्या चौकशी दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात जालना शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक श्रीकांत जगन्नाथ पांगारकरला दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. पांगारकर हा २००१ ते २०१० काळात २ वेळा शिवसेनेचा नगरसेवक राहिला होता.

श्रीकांत पांगारकरचा अल्पपरिचय

शिवसेनेने श्रीकांत पांगारकर हा २००१ ते २००५ कालावधीत गणपती गल्ली आणि भाग्यनगर या भागातून निवडू आले होते. यानंतर २००५ ते २०१० मध्ये पुन्हा शिवसेनेच्या उमेदवारीवर ते शिवनगर भागातून नगरसेवक झाला होता. २०११मध्ये उमेदवारी न दिल्यामुळे श्रीकांत पांगारकर शिवसेने बाहेर पडले. यानंतर त्यांनी हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम सुरू केले.

Related posts

“तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले  

News Desk

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

News Desk

पाटलांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो, पण फटका लगावतो !

News Desk