HW News Marathi
Covid-19

पंकजांनी फोनवरून केली धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस

मुंबई | राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आल्यानंतर आता भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. “तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर ठणठणीत व्हा”, असे म्हणत पंकजांनी धनंजय मुंडेंची फोनवरून विचारपूरस केल्याची माहिती मिळते. दरम्यान, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाव-बहिणीमधले टोकाचे राजकीय वैर उभा महाराष्ट्र जाणतो. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकमेकांचे अगदी कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र, तरीही या कठीण काळात सर्व मतभेद बाजूला सारून पंकजांनी धनंजय मुंडेंना धीर देऊन त्यांची विचारपूस केली आहे.

“धनंजय मुंडे हे फायटर आहेत. ते लवकरच कमबॅक करतील”, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात धनंजय मुंडेंचे २ स्वीय सहाय्यक, मुंबईतील आणि बीडमधील वाहन चालक, स्वयंपाकी यांचा समावेश आहे. मात्र, धनंजय मुंडेंसह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लक्षणे नाहीत. दरम्यान “धनंजय मुंडेंनी कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्यांना श्वसनाचा थोडा त्रास होऊ लागल्याने आता मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे”, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्य प्रेमींसाठी खुशखबर, मद्य खरेदीसाठी ई-टोकन सुविधा सुरु !

News Desk

दिलासादायक ! राज्यात आतापर्यंत ११ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा

News Desk