HW News Marathi
महाराष्ट्र

“५०० कोटी देण्याची ताकद आहे?”; धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा संतापल्या

बीड | नगरपंचायतीच्या निमित्ताने आयोजित एका प्रचारसभेला संबोधित करताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या एका विधानाचा आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आता समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे आपल्या पाटोदा येथील प्रचारसभेत बोलताना म्हणाले कि, “ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी ५० कोटींच्या कामाच्या भूमीपूजनाला येऊ”. दरम्यान, आता धनंजय मुंडेंच्या याच विधानावरून पंकजा मुंडेंनी आज (१९ डिसेंबर) धनंजय मुंडेंना सुनावलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील वडवणी नगर पंचायत प्रचारसभेला संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणल्या की, “केज आष्टी पाटोदा, शिरूर, वडवणी या ठिकाणी एका झटक्यात निवडून आल्यास ५०० कोटी रुपयांचानिधी देऊ अशी घोषणा केली तर मग गेली २ वर्षे काय टाळ पिटत होते काय? तुमची ताकदच नाही”, अशी अत्यंत बोचरी टीका पंकजा मुंडेंनी केली आहे. त्यामुळे, आता धनंजय मुंडे पुन्हा ह्यावर काहीतरी प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला कोणीतरी म्हणालं की निवडून आल्यावर १०० कोटी देणार अशी घोषणा कोणीतरी पाटोद्यात केली. तीच घोषणा म्हणे शिरूरमध्ये केली, तीच घोषणा म्हणे आष्टीत केली आणि आता ऐकलं की केजमध्येही तीच घोषणा केली. म्हणजे किती कोटी झाले बरं? ५०० कोटी झाले. आता एका झटक्यात ५०० कोटी मग गेली २ वर्षे काय टाळ पिटत होते काय? हे पैसे द्यायची ह्यांची ताकदच नाही.” 

२१ तारखेला आष्टी- पाटोदा -शिरूरची घाण काढायची असेल तर…!

“मराठा, ओबीसी आरक्षण रद्द झाला. त्याला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप भाजपवाले करतात. मात्र, पेट्रोल-डिझेल, गॅस महागला, महागाई गगनाला भिडली, त्याला कोण जबाबदार? यावर विरोधक का बोलत नाहीत?”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी संबंधित प्रचारसभेत केंद्र सरकारवर देखील टीका केली होती. तसेच येत्या २१ तारखेला आष्टी- पाटोदा -शिरूरची घाण काढायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा, असं आवाहनही धनंजय मुंडेंनी केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

News Desk

फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

Aprna

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”; कॅबिनेट बैठकीतील निर्णय

News Desk