HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मध्य प्रदेशात पंकजा मुंडेंच्या मॅरेथॉन सभा

मध्य प्रदेश | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सध्या मध्यप्रदेशात एका भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन सभा घेत आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच विकासाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या, हे वास्तव आहे. भाजपच्या उमेदवाराला दिलेले मत हे थेट मोदींना जाणार आहे त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करा”, असं आवाहन यावेळी पंकजा मुंडेंनी केलं आहे. खंडवा लोकसभा पोटनिवडणूकीचे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ खकनार, दर्यापूर, नेपानगर येथे आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, “एखाद्या ठिकाणी पोटनिवडणूक लागणं ही चांगली बाब नाही. आम्ही त्यातून गेलो आहोत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब गेल्यानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यांच्या नेतृत्वाच्या करिश्म्यामुळे प्रीतम मुंडे विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. खंडावा मतदारसंघातही नंदकुमार चौहान यांच्या निधनाने ही निवडणूक लागली आहे. नंदूभैय्या यांना आदरांजली म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांना विजयी करा”, असं आवाहनही यावेळी पंकजा मुंडेंनी केलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींची केवळ देशातच नव्हे तर जगात लोकप्रियता आहे. ते एका गरीब कुटुंबातून पुढे आले आहेत. त्यांनी गरिबी जवळून पाहिली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गरीब माणसाला ते आपलेसे वाटतात. गरीबांची जाण असल्याने सर्व सामान्यांसाठी त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या. तर काँग्रेसला अखेरची घरघर लागली आहे. त्यांचा हात गरीबांसोबत कधी नव्हताच, त्यांना मतदान करू नका.भाजपच्या उमेदवाराला दिलेलं मत थेट मोदींपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांना बहुमताने विजयी करा”, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं.

बंजारा भाषेत संवाद साधत जिंकली मतदारांची मनं

खंडवा लोकसभा मतदारसंघात बंजारा समाज मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी या भाषेत थोडासा संवाद साधून मतदारांची मनं जिंकली. “तमार छोरिरो चकेन जय सेवालाल! तम मन आशिर्वाद दिने अन म प्रचारेंन आवगी. तमारो मान राकाडी पन मोठे मतेती इ शीट विजयी करो मार विनंती छ. तम मोठे संख्या ती मतदान करतानि आपले उमेदवारेन विजयी करो”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

Aprna

अमित साटम यांनी PAP घर खरेदीत भ्रष्टाचार केल्याबद्दल सेनेला फटकारले

Aprna

आमचा पक्ष जातीयवादी नाही- जयंत पाटील

swarit