HW News Marathi
देश / विदेश

पंकजा मुंडे आमच्या नेत्या, त्यांना भेटून मुंडे साहेबांची आठवण आली – डॉ भागवत कराड

नवी दिल्ली | भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ह्या नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू असतानाच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काल (१२ जुलै) दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेत त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या वेळी डॉ. कराड यांनी ‘गोपीनाथ मुंडे साहेब आमचे नेते होते, आता पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत,’ अशा शब्दांत कराडांनी भावना व्यक्त केल्या आहेत. प्रीतम मुंडेंच्या जागी कराड यांना स्थान मिळाल्याने नाराजीच्या चर्चा सूरू असताना पंकजा आणि कराड यांची भेट महत्वाची मानली जाते.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत त्यांचे नाव मागे पडले आणि डॉ भागवत कराड यांना मंत्रिपदाची

लॉटरी लागली. डॉ. कराड यांच्यामुळे प्रीतम मुंडे यांची मंत्रीपदाची संधी हुकली, अशी भावना मुंडे समर्थकांमध्ये तयार झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि डॉ. कराड यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. डॉ. कराड यांची (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. परंतु मुंडे भगिनींना डावलून वंजारी समाजातील डॉ. कराड यांना भाजप नेतृत्वाकडून पुढे आणले जात आहे, अशी चर्चा मुंडे समर्थकांमध्ये सुरू आहे.

 

डॉ. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात समावेश न होऊनही पंकजा मुंडे यांनी नाराजी न दाखवता पत्रकार परिषदेत आपण पक्षावर नाराज नसल्याचे म्हटले हेाते. तसेच, डॉ. कराड यांचा शपथविधीच्या आदल्यादिवशी फोन आल्याचे सांगितले हेाते. एकीकडे पंकजा मुंडे नाराजी दाखवत नसल्या तरी राज्यात काही ठिकाणी समर्थक राजीनामे देत आहेत. बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येत होती. त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत सुमारे ८० पक्ष पदाधिकाऱ्यांनी नाराजी दाखवत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यात काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेली पंकजा मुंडे आणि डॉ. भागवत कराड यांची अखेर आज दिल्लीत भेट झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. कराड यांनी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दोघांनी तासभर गप्पा मारल्या. त्यावेळी ‘(स्व.) गोपीनाथ मुंडे साहेब आमचे नेते होते, आता पंकजा मुंडे आहेत,’ अशा शब्दांत कराड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ताजमहाल’चं नामकरण ‘राम महाल’ होणार, भाजप आमदाराचा दावा

News Desk

माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न – प्रवीण तोगडिया

swarit

कोरोनाशी लढण्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची घोषणा | निर्मला सीतारामण

swarit