HW News Marathi
महाराष्ट्र

बहुजन नेत्यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची – पंकजा मुंडे

बीड | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडल्यानंतर अनेकांना भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा जीव घुसमटत आहे, असे म्हटले जात होते. भाजप पक्षात बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची आहे. माझा स्वत:चा तरी तसा अनुभव नाही. मला काम करण्याचे स्वातंत्र्य आहे , अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे. तसेच राज्यातील बहुजन नेते काहीसे भांबावले असून आरक्षणाच्या विषयामुळे अनेक बुहजन नेत्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत, असेही मुंडे म्हणाल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, ही आमची भूमिका आहे. मुळात आरक्षणाच्या विषयावरून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विविध पातळ्यांवर होत आहे, हे पूर्णतः चुकीचं असल्याचं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे.

सध्या ज्या पद्धतीने वातावरण उभे केले जाते. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्यास खतपाणी घातले जात आहे. पूर्वी शिक्षकांचे, शेतकऱ्यांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे मोर्चे निघत होते. गेल्या काही वर्षात जातीवर आधारीत मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आरक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीदेखील मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. मात्र, मराठा आरक्षण देताना बहुजनांच्या सध्याच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, अशी यामागील भूमिका आहे.असेही मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ आता पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र!

News Desk

ST संपावर पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार

Aprna

बोईसर- महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन ऍकॅडमी -तारापूर तर्फे शालेय कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन

News Desk