HW News Marathi
महाराष्ट्र

समर्थकांचे राजीनामा सत्र, पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळालं नाही . या गोष्टीवरून राजिक्य वातावरण आणि मुंडे समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. बीडमध्ये राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. कालपासून भाजपमधील अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी येत्या मंगळवारी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना

शुक्रवारी (९ जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना ‘ आम्ही नाराज नाही आहोत. निवडून आलेल्यानं आम्ही अभिनंदन देतो’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटल. तरीही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे बीड मध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वरळी येथील कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची समजूत काढणार की काही वेगळाच निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील भाजपच्या 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे रविवारी सकाळीच दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

बीड मध्ये ११ तालुकाध्यक्षांचा राजीनामा

खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या ११ तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता २५ वर पोहोचली आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन- प्रिया बेर्डे

News Desk

बोरघाटात विचित्र अपघात, १० गाड्या एकमेकांना धडकल्या 

News Desk

चला पुन्हा एकदा रामराज्य प्रस्थिपात करुयात, सुशांतच्या बहिणीचा सल्ला

News Desk