HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा उद्या पुणे, पिंपरी चिंचवड दौरा; राज्यव्यापी ‘चक्का जाम’ची ठरवणार रणनिती

पुणे । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या रविवारी (२० जून) पुणे दौर्‍यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने येत्या २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ओबीसी नेते वेगवेगळ्या जिल्हयाचा दौरा करत असून त्यानुसार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या उद्या पुण्याच्या दौर्‍यावर येत आहेत.

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे शहर जिल्हयाची बैठक उद्या सकाळी ११.३० वा. भारतमाता अभ्यासिका पर्वती येथे तर दुपारी ४ वा. पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवडची संयुक्त बैठक हाॅटेल कलासागर, कासारवाडी येथे होणार आहे. या बैठकीस जिल्हा पदाधिकारी, आमदार-खासदार (सर्व लोकप्रतिनिधी), जिल्हा व मंडलाचे अध्यक्ष तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश , जिल्हा व मंडलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकी दरम्यान पंकजा मुंडे ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बहुजन समाजाच्या नेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणावरुन खुप त्रास झाला – अजित पवार

News Desk

अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

swarit

कर्जमाफीसाठी आता जिवंत शेतकऱ्यांचे श्राद्ध

News Desk